मराठेशाहींतील स्त्रियांची कर्तबगारी


पराक्रमास क्षेत्र मिळाले म्हणजे स्त्री काय किंवा पुरुष काय कोणत्याही व्यवहारांत कमी जास्त हुशारी सर्वत्र दाखवितांत. हल्ली विमानांचा संचार वृद्धि पावत असून त्यांत आपण अनेक युरोपीय स्त्रिया साहसाने उद्योग करीत असलेल्या पाहतो, तसाच प्रकार महाराष्ट्रांतही ऐतिहासिक कालांत घडून आला. नुसत्या विवाहित स्त्रिया राष्ट्रोद्योगांत खपत होत्या असे नाही, तर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे बहुतेकांच्या ज्या रक्षा असता त्या देखील पुरुषांस उत्कृष्ट साह्य करीत. प्रतिनिधींची रमा तेलीण, होळकरांची तुळसाबाई, बाजीरावाची मस्तानी यांची नांवे थोडबहुत प्रसिद्ध आहेत. रमा तेली ही परशुराम श्रीनिवास उर्फ थोटेपंत याची रक्षा. हा पुरुष सन १७७७ त बापाचे मृत्युदिनीच जन्मला व सन १८४८ त मरण पावला. पराक्रमाच्या दृष्टीने तो कोणत्याही बाबतींत कमी नव्हता, पण हट्टी व छांदिष्ट स्वभावामुळे त्याचे घरांत किंवा बाहेर कोणाशी कधी पटले नाही. त्यांतून दुसऱ्या बाजीरावाने त्याचा छळ चालविला, त्यामुळे अधिकच चिडून त्याने कैक वर्षे बाजीरावाशी मोठ्या निकराचा सामना केला. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



इतिहास

प्रतिक्रिया

  1. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद. न माहीत असलेल्या इतिहासाची आणि पराक्रमी ( सर्व अर्थाने ) स्त्रियांच्या बद्दल माहीती असलेला लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल. विशेष आभार.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen