वाङ्मय म्हणजे काय हे कळण्याआधी माझ्या वडिलांच्या एका कृतीनं मी ते शिकत गेलो. पत्रकार-लेखकांची माझी तिसरी पिढी. माझ्या लहानपणी माझ्यावर माझ्या आजोबांचे वगैरे संस्कार झाले असं अजिबात घडलं नाही. माझे आजोबा धनुर्धारी, १९०७ साली वारले. वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी. तत्पूर्वी त्यांनी पूर्णवेळ लेखक होण्याचा प्रयोग केला आणि गरिबी स्वीकारली. ‘वाईकर भटदी’, ‘पिराजी पाटील’ ह्या दोन कादंबऱ्या आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिले स्तंभलेखक हा मान एवढा वारसा माझ्या वडिलांना मिळाला आणि त्यांच्याकडून तो माझ्याकडे आला. हे मला सगळं नंतर कळलं, कारण माझा जन्मच मुळी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३६ वर्षांनी झाला. माझे वडील थोडेसे कवी, थोडेसे पत्रकार-संपादक आणि अत्यंत रागीट होते. सकाळी घरातून बाहेर पडण्याआधी, घरात काळा रंग फासलेल्या भिंतीवर एक श्लोक लिहून ठेवायचे. त्यांना अशी अपेक्षा असायची की आम्ही भावंडांनी खेळत खेळत तो सारखा म्हणता राहावा आणि तो आपोआप पाठ व्हावा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santosh Waykos
3 वर्षांपूर्वीपूर्ण लेख वाचण्यासाठी काय करावे लागेल
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीमार्गदर्शक असा लेख आहे ? या पूर्वी वाचल्या सारखा वाटतोय . रिपीट केलाय का ? पण छान आहे .