शिवाजीमहाराजांच्या मागून सुमारे पंचवीस वर्षे महाराष्ट्रांत औरंगजेबाच्या स्वारीमुळे जो धुमाकूळ माजला होता, त्याकडे बारकाईने पाहिल्यास वरून तो शुद्ध अराजकासारखा दिसला तरी राज्यरक्षणाच्या दृष्टीने त्याच्या पोटीं कार्यक्षमतेचे भरपूर बळ असल्याचे दिसून येईल. कुठे दक्षिणेंत जिंजी व कुठे महाराष्ट्र! परंतु मोगलांच्या बंदोबस्ताला न जुमानतां मराठ्यांच्या फौजा व सेनापती जिंजीहून येणाऱ्या आज्ञेप्रमाणे आपली पराक्रमाची कामे पार पाडण्याला चुकत नव्हते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभिमान मराठ्यांना मोगलांशी लढवीत होता. किल्ले गेले; पुष्कळसा प्रदेश औरंगजेबाने पायदळी तुडवला; पण मराठ्यांच्या लढाऊ स्वाभिमानाने मराठ्यांना स्वराज्यरक्षणाच्या ध्येयापासून यत्किंचित् ढळूं दिले नाही. त्या स्वाभिमानाचा योग्य उपयोग करून घेणारे राज्यसूत्रधार शिल्लक होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santosh Waykos
3 वर्षांपूर्वीलेख पूर्ण वाचता येत नाही , व आपल्याकडून देखील प्रतिसाद नाही
Santosh Waykos
3 वर्षांपूर्वीलेख पूर्ण वाचता येत नाही , व आपल्याकडून देखील प्रतिसाद नाही