ह्या परंपरेची सर्वांनाच इतकी सवय झाली आहे की, एका विवाहसमारंभात वरमायेनं पाय धुऊन घेण्यास नकार दिला, फक्त ओटी भरून घेतली. पण मुलीची आईच म्हणू लागली,
“मला केवढी हौस विहिणीचे पाय धुण्याची. पण त्यांनी काही पाय धुवून घेतले नाहीत.” दुसर्याचे पाय धुण्यात कसली आली हौस?
वास्तविक पाय धुण्याची वाईट प्रथा मोडल्याबद्दल त्या विहिणबाईंचे सर्वांनी अभिनंदन करायला हवं!
हल्ली विहीणीचा तोरा पूर्वीपेक्षा थोडा कमी झाला आहे हे खरं. पण पूर्वी रासनहाणाचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे विहीण व तिचा परिवार ह्यांना सुगंधी तेलानं मर्दन करून – उटणं लावून अभ्यंगस्नान घालत.
तिचं पाऊल नुसत्या टणक जमिनीवर पडून दुखू नये म्हणून तिच्यासाठी पायघड्या घालत! आजच्या एक दिवसाच्या कंत्राटी लग्नसमारंभात ह्या गोष्टींना निदान शहरात तरी फाटा मिळाला हे छान झालं आहे.
वरमायेनं सध्या आहे एवढासुद्धा रूबाब करता कामा नये. काही वर्षांपूर्वी आपल्याला मुलगा झाला होता, एवढ्याचसाठी ह्या समारंभात आपला मानपान झाला पाहिजे ही कल्पना तिने सोडून दिली पाहिजे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .