आरोग्य-भुवनाचे एक हितचिंतक व एका एक्स्पोर्ट इंपोर्ट एजन्सीचे मालक अशा एका गृहस्थांनी दररोज दहा दहा बारा बारा पाकिटे सिगारेट लागावयाचे ते बंद करून धूम्रपान करण्याचे अजिबात सोडून दिले आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे धूम्रपानाप्रीत्यर्थ होणारा खर्च बाजूला ठेवून तो सर्व राष्ट्रीय काऱ्याला देण्याचा निश्चय केला आहे.
या गृहस्थांचा असा अनुभव आहे की; हे धूम्रपानाचे व्यसन सोडावयाचे असेल तर स्ट्रॉंग पेपरमिंटच्या एका वडीचे चार तुकडे करून विडी सिगारेटची तलफ येताच एक तुकडा तोंडात टाकावा. अशा प्रकारे दोनचार दिवस गेल्यास पुढे विशेष त्रास होत नाही.
(पेपरमिंटच्याऐवजी आलेपाक वडी उपयोगात आणल्यासही चालेल.)
आरोग्य-भुवनाचे दुसरे हितचिंतक सॉ. बाळासाहेब खेर यांनीही सिगारेटचे राष्ट्रीय दृष्ट्या दु:परिणाम लक्षात आणून सिगारेट पिणे बंद करून गुडाख ओढण्यास सुरुवात केली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .