शिवाजी एक अभ्यास - भाग तिसरा


अंतर्गत सुराज्य-निर्मितीतील पहिले पाऊल म्हणजे गुंड, मग्रूर व बेजबाबदार वतनदारांच्या कटाच्यातून गरीब रयतेची सुटका करून राजसत्तेचा वचक व तिच्याबद्दल योग्य तो आदर थेट तळापर्यंत पोहोचविणे हे होय. हा वचक व आदर कसा प्रस्थापित करायचा याचे प्रत्यक्ष शिक्षण महाराजांना दादोजी कोंडदेवांकडून लहानपणीच मिळाले होते. युद्धतंत्र जसे महाराजांनी आपले वडील शहाजीराजे यांचेकडून उचलले, तसे रयतेवर अंमल कसा बसवावा याचे कसब त्यांनी दादोजींकडून आत्मसात केले होते. स्वराज्याच्या प्रारंभीची गोष्ट. मावळातले वतनदार-देशमुख शिवाजीला हळूहळू मानू लागले होते. काही मात्र साफ जुमानीत नसत. दादोजी दयामाया न दाखविता अशा कित्येक शिरजोरांना कडक शिक्षा करून वठणीवर आणीत होते. खोडबाऱ्यातला रामाजी चोरघे याला दादोजींनी साफ ठार मारला. गुंजण मावळातला फुलजी नाईक शिळमकरला बांबूने झोडपून काढले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



इतिहास

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर मांडणी .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen