पूर्वीच्या चारवर्णी आणि साचेबंद ग्रामीण अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे प्रमुख साधन जमीन होते. आणि जरी शेतीच्या आसापासस उत्पन्न होणारे किरकोळ सुतारी, लोहारीसारखे धंदे चालिवले जात असत तरी त्यांचे पोषण बळीराजा शेतकरीच करी. आणि अर्थातच राज्यकर्त्यांना मिळावयाचे बहुतेक उत्पन्न त्याच्याकडूनच सरकारी खजिन्यात जमा होई. त्या वेळच्या अर्थसंघटनेचे समर्पक प्रतीक म्हणजे निरनिराळे बलुतेदार व अलुतेदार (करूनारू) हे कासेच्या निरनिराळ्या ओळीचे वतनदार म्हणून वर्णिलेले अढळतात. आपल्या पारडाला जीवनरस पुरविणारी गोमातेची कास म्हणजे ग्रामवासियांचे पालपोषण करणारी जमिनची शेती. तिचे आंचळांना क्रम देऊन तिजवर अवलंबून असणाऱ्या उद्योग करणारांची विविध प्रकारे प्रतवारी ठरविणाऱ्यांचा प्राचीनांचा उद्योग म्हणजे सहृदय अर्थकाव्यच होय.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Harihar sarang
3 वर्षांपूर्वीछान सुरुवात. अपेक्षा निर्माण करणारी.