पूर्वीच्या अंदाधुंदीच्या काळांत बांधून दिलेल्या धारापद्धतीशिवाय अधिक वसूल करण्याचा आणखी एक शिष्टसंमत मार्ग म्हटला म्हणजे सरकारने व देशमुख-देशपाड्यांनी रयतेवर आणखी पट्ट्या बसविणे हा होता. देवस्थाने व विद्वान वेदमूर्ति यांची इनामे व वर्षासने ही अशाच पद्धतीने रयतेला पुण्य मिळावे म्हणून वसूल केली जात. व या देवस्थानांचे वा वेदमूर्तींचे गुमास्ते क्वचित् चालू वहिवाट प्रस्थापित करून परस्परही आपआपल्या मालकासाठी वसुली करून घेऊन जात. महाराजांनी या पट्ट्यांमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या जादा व बऱ्याच वेळा अनिश्र्चित म्हणून जुलमी आकारणीचा बंदोबस्त केला (शिवचरित्रसाहित्य खंड ४ ले. ६८३.) आणि रयतेला उत्पन्नाची शाश्र्वती मिळवून दिली. राजांनी धर्मादाय इनामे बंद केली नाही. परंतु ती रयतेकडून वसूल केली जात ते बंद केले व त्यांची रक्कम किंवा गल्ला सरकारी तिजोरींतून किंवा कोठींतून सरकारी अधिकाऱ्यांनी परस्पर द्यावी असे ठरविले. यामुळे रयतेवरचे केवढे दडपण कमी झाले हे समजण्यासाठी त्या काळामध्ये कल्पनेनेच संचार केला पाहिजे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .