‘सत्कार’मध्यें थोडें खाऊन नि कॉफी पिऊन ती जुहूच्या दिशेने निघाली तेव्हा सायंकाळची किरणे उतरूं लागली होती. जुहूच्या किनाऱ्यावर अध्याप वर्दळ सुरू झाली नव्हती. समोर निळा समुद्र सायंकाळच्या कोवळ्या किरणांत चमचमत होता. समुद्रकांठावरील माडांच्या झावळ्या मंद वाऱ्यावर सळसळत होत्या आणि सर्वत्र एक उत्साहवर्धक वातावरण जाणवत होते. सुमती आणि राघव किनाऱ्याच्या एका टोकाला, जिथे मुळीच गर्दी नव्हती, अशा ठिकाणी एकमेकांना बिलगून बसली. वाळूत राघवने अक्षरे कोरली- ‘सुमती-राघव.’ सुमतीने एकदा राघवकडे हसून पाहिले नि हळूवारपणे ‘सुमती’ या शब्दाच्या आधी ‘सौ.’ हे अक्षर कोरले. राघव हंसला. त्यालाही थट्टेची लहर आली. त्याने कंसांत ‘सौ. सुमती’च्या पुढे ‘आणखी चार दिवसांनी--’ असे लिहिले...
समोर क्षितीजावर सूर्यबिंब बुडत होते. निळा प्रहर उभा राहिला होता. सुमती आणि राघव त्या प्रहरांत गुरफटली होती, आस्ते आस्ते स्वतःला विसरत होती आणि एकमेकांची स्वप्ने घेऊन जगत होती. दोघांचीही श्वसने आणि स्पंदने जणू एकाच लयींत चालली होती. त्यांचा एकच ताल होता. एकच रंग होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rajiv Kulkarni
3 वर्षांपूर्वीया पेक्षा काय वेगळा शेवट अपेक्षित असू शकतो???😄