सारे प्रवासी घडीचे - पूर्वार्ध (१९६५ सालची समीक्षा)


आपू हा येथे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतो आहे. आपू हे त्याचे बालपणाचे नांव. मध्ये अनेक वर्षांचा खंड पडल्यानंतर तो कोकणातील आपल्या जन्मगावी आला आहे. प्रवासात त्याच्या डोक्यांत मृत्यूचे विचार घोळत राहतात हे अर्थपूर्ण आहे. बाळपणी ज्यांचा सहवास मिळाला त्यांच्यापैकी आता कोण हयात असतील व कोण गेले असतील या विचाराने त्याच्या मनाला ग्लानि येते. मनाची ही स्थिति 'ग्लानि' या शब्दांत दळवींनी अतिशय अचुकपणे व्यक्त केली आहे. पुस्तकांत कित्येक विनोदी- अगदी पोट भरून हंसावे-असे प्रसंग आहेत. तथापि मनाला ग्लानि आणणारी व्याकुळतेची ही भावना त्यातील सर्व चित्रणाच्या तळाखालून संथपणे वाहत असल्याचा भाग होतो. दळवींचे हे एक मोठे यश.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    जयवंत दळवी हे यशप्राप्त लेखक. कोकणामधील त्यांच्यासारख्या लेखकांमुळे मराठीत,कोकण निसर्ग आणि तेथील व्यक्तींसह जिवंत उभे राहिले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen