कोणताही रोग नाहीसा करावयाचा झाल्यास त्यावर वैद्य दुहेरी उपाय सांगत असतो, “एक, अमुक औषध घ्या आणि दुसरे, अमुक पथ्य पाळा.” पथ्य हे नेहमी नकारात्मक असावयाचे. जसे, बाधक पदार्थ खाऊ नयेत, थंड पाणी पिऊ नये वगैरे. ह्याच गोष्टीचा दृष्टांत घेऊन आपण स्वदेशीचा विचार केला तर, हिंदुस्थानच्या दारिद्र्यरोगावर स्वदेशी माल विकत घेणे हे औषध ठरेल मग पथ्य कोणते? पथ्य म्हणजे परदेशा मालावर बहिष्कार हे होय. वर सांगितलेच आहे की, पथ्य हे नकारात्मक असते. त्यांत काय करूं नये हे सांगितलेले असते. बहिष्कार ही अशीच नकारात्मक गोष्ट होय.
‘परदेशी मालाचे गिऱ्हाईक कमी करणे हीच तो माल आमच्या देशांत न येण्याच्या तजविजीची पहिली पायरी होय. होईल तितके करून स्वदेशी मालच वापरावयाचा असा पुष्कळ लोकांनी संकल्प केला म्हणजे देशी मालाचा खप वाढून तो जास्त जास्त उत्पन्न करण्यास उमेद येईल.’ या साध्या शब्दांत १८९६ साली केसरीकारांनी स्वदेशी व बहिष्कार या औषधपथ्याची माहिती दिली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .