व्यापरधंद्यापेक्षां नोकरीकडे अगर खासगी धंद्याकडे आमच्या लोकांचे विशेष लक्ष असण्याचे कारण त्याविषयींच्या ज्ञानाची कमतरता हे तर एक आहेच, परंतु दुसरे व विशेष कारण म्हणजे व्यापाराबद्दल वाटत असलेली अशाश्र्वती हे होय. व्यापारांत पडून प्रसंगी हातचे असेल तेही गमावण्यापेक्षां खात्रीची मीठभाकरी पुरविली असेच बहुतेकांस वाटते. त्यामुळे व्यापारांत शिरण्यस अनुकूल स्थिती असणारेही कित्येकजण त्याला हाती घेण्यास धजत नाही. अलीकडे ही प्रवृत्ती थोडी बदलत आहे हे देशाच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. व्यापारविषयी अशा प्रकारची साशंक दृष्टी कां असावी याचा विचार केल्यास आपणांस असे दिसून येईल की व्यापाराचा सशास्त्र रीतीने अभ्यास करणारे व त्यांतील सिद्धांतांच्या अनुरोधाने व्यापार करणारे फार थोडे आढळतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .