कदाचित् देशसेवकानें स्वतःच्या उदरनिर्वाहाची किंवा एकंदर उपजीविकेची मुळींच फिकीर करूं नये. देश त्याची काळजी घेईल, इत्यादि जें तत्त्वज्ञान त्यांनी ऐकले होते, त्याचा त्यांच्या मनाला आधार असेल. कोणी सांगावें? एवढे खरें की, कमलाबाईंनी गृहत्याग करण्याचा निश्र्चय केला. व तो त्यांनी तत्काळ अमलांत आणण्याचे ठरविले. त्यांनी पुढे होऊन दार उघडले व बाहेर पाहिले. केशवराव पाय पसरून व छातीवर हात ठेवून वर पाहात पडले होते. वास्तविक त्यांची मनःस्थिति किती चमत्कारिक होती, हे त्यांचे त्यांना माहित. कमलाबाईंना मात्र वाटले की, ते त्याविषयी अगदी बेफिकीर आहेत. त्यांना आणखी उफाण आले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .