दुसरा वर्ग याच्या उलट असतो. तो म्हणतो, काय बिशाद आहे मला कोणी फसवील? बाजार करण्यांत मनुष्याने दोन्ही डोळे कसे साफ उघडे ठेवले पाहिजेत! वाणी, मारवाडी, भाजीवाला प्रत्येक मनुष्य लुच्चा हे. खोट वजने मापे असायचींच! किंमत अव्वाच्या सव्वा सांगायची त्यांना संवयच. व्यापाऱ्याने ज्याची किंमत चार आणे सांगितली ती खुशाल एक आण्याची आहे असे समजावे. मग ती पाव आण्यापासून मागण्यास सुरवात करावी. म्हणजे तो मुकाट्याने एक आण्या दीड आण्यापर्यंत देतो. दुकानातून निघून जाण्याचा आव आणावा. दुसरीकडे ती फार स्वस्त मिळते असे खोटेंच सांगावे. तात्पर्य, थोड वेळ मोडला तरी हरकत नाही. परंतु बाजार कसा कसोशीने करावा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .