‘निरंकुशाः कवयः’ असे म्हणणारा कोणीसा एक प्राचीन पंडित, ‘नखानां पांडित्यं प्रकटयतु कस्मिन् मृगपतिः’ असे गर्वोद्गार काढणारा कविराज जगन्नाथ पंडित, ‘उत्पत्स्यतेSति मम कोSपि समानधर्मा। कालो ह्यंय निरवधिर्विपुला च पृथ्वी’ अशा भविष्यकाळाचा हवाला देणारा भवभूति किंवा ‘अशी असावी कविता फिरून। तशी नसावी कविता म्हणून। सांगावया कोण तुम्ही कवीला। आहांत मोठे पुसतो तुम्हांला...’ असा टीकाकारांना निर्भयपणे सवाल करणारे केशवसुत या सर्वांनी आपल्या साहित्यासंबंधी प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्यांची तोंडे अगदी कायमची बंद करून टाकली आहेत. आणि ही सारी अवतरणे मला स्वतःला तोंडपाठ आहेत. पण तरी देखील, आपल्या लेखनावर कोणीही प्रतिकूल मत दिले तरी, मी मात्र यांतले कोणतेही उत्तर त्याला देऊ शकत नाही. याचे कारण हेंच की, मी वर उद्धृत केलेल्या लेखकांप्रमाणे थोर नसल्यामुळे त्यांच्या अहंतेचा आश्रय मला करतां येत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .