आतां कर्णाच्या तोंडची कांही मुक्ताफळें पहा, कुंतीवर रागावलेला कर्ण म्हणतो- 'आईचं अंतःकरण! असलीं अंतःकरणं वरच्या गोजिरवाण्या स्तनांसकट हत्तीच्या पायाखाली ठेचली पाहिजेत चालती हो अिथून! कैदाशिणी, चाळीस वर्ष जें रहस्य तू उरांत दडवून ठेवलस तें आणखी चार घटका तसंच ठेवलं असतंस तर काय तुझ्या छातीला तडे गेले असते? आई म्हणे! कोणाहि पुरुषाच्या पलंगावर पाय पसरले तर कोणतीहि दीडदमडीची स्त्री आई होऊन जाते. काय गौरव आहे त्याचा! रस्त्यावरच्या कुत्र्यासुद्धां माता होतात. त्यांच्या मस्तकावर कुणी मंगल मातृत्वाचे मुकुट चढविले नाहीत. मग माणसाच्या मादीनेंच काय असं पुण्य केलं आहे की तिला परमेश्वराच्या शेजारी नेऊन बसवावं!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .