खानदानी मुसलमानाची अदब लाघवीपणा आणि आदरातिथ्याची कला वहिदसाहेबांच्या अंगांत पूर्ण आहे. ते म्हणाले,
'आपण जेवण घेऊनच पुढे जाऊ.' आम्हांस त्यांच्या आकर्षक पत्नीने विनयशीलपणाचा अविर्भाव दाखवून बसवून घेतले तो त्यांचा जुना पांढऱ्या शुभ्र कपड्यांतला, शुभ दाढी छातीवर रुबाबदार चेहरा तर संस्थानी अमदानीतला अवशेषच दिसत होता. त्याचे रूबाबदार, धीरगंभीर व रेखीव असे छाप पाडणारें व्यक्तीमत्व पाहून, अजंठ्याच्या रहस्यमय वातावरणांत खरोखरीच शिरलो आहोत, अशी मनोमन खात्री पटली.
बेगमसाहेबाँ सांगत होत्या की रोजच्या साध्या गरजेच्या वस्तुही आसपासच्या खेड्यांत मिळणे मुष्किलीचे आहे आणि कुणी आजारी पडले तर डॉक्टरसुद्धा औरंगाबादेहून नाहीं तर जळगांवहून आणावा लागतो. आणि पुढे त्या चेष्टने तक्रारीच्या सुरांत म्हणाल्या, और इन्होनें तो पूरी जिंदगी अजंठापर बलहार करके ऐसीही बरबाद करनेकी कसम खाई है जैसी। एक औरतके मालीक है लेकिन दिल कुर्बान है अजंठाके रंगिन बेगमोपर परियोंपर फत्तरोके राजे है.'
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .