वधूची परीक्षा करून उभयतांच्या मस्तकांवर अक्षता पडल्या, धर्मेच अर्थेच कामेच दोघेही परस्परांशी अग्नी नारायणासमोर प्रतिज्ञाबद्ध झाले की असे वाटेल की उंच पर्वताच्या शृंगावर आपण पोंचलो आतां एखाद्या सोप्या जवळच्या रस्त्याने खाली तरण्यास आरंभ करण्यास हरकत नाही. पण सप्तपदी संपून संस्कार पूर्ण झाला म्हणजे काय? तर प्रियाराधन समाप्त होऊन विवाहास प्रारंभ जाला. मंत्राचा उच्चार होऊन गेला, परंतु कार्य अवशिष्ट राहिले. दोघींची मने एक होणे, दोघांच्या आकांक्षा, विचार, विकार आणि भावना तन्मय होऊन जाणे, परस्परांची सुखदुःखे, चिंता, भीती, आनंद यांचे अद्वितीयत्व साधणे, तात्पर्य उभयतांनी उभयतांची हृदये ओळखणे, जाणणे, नव्हे, दोघांचे मिळून एकच अंतःकरण होणे हे मुख्य कार्य यापुढेच व्हावयाचे असते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .