माझ्या आयुष्याची चौकट जशी खिळखिळी झाली होती तशीच ही चौकडीहि फुटली होती. दोघांविषयीं मला कळले होते, तिसरा समोर बसला होता, आता राहता राहिला चौथी व्यक्ती! तिच्याविषयीं कांहीं कळले तर जाणून घेण्यास तर मी विशेष उत्सुक होतों, भीतभीतच मी विचारलें, “शारंगपाणी, तुमच्याबरोबर त्या बाई असत त्या कुठे असतात?–" मला वाटलें कीं माझा प्रश्न ऐकून तो खुलेल. रंगांत येऊन म्हणेल, "त्या होय!- त्यांचे आणि माझे लग्न झाले- माझा संसार करते आहे आतां ती-" आणि मला खिजवण्याकरतां तो खदखदून हंसेल. शारंगपाणीचे आणि तिचें विशेष सख्य होते. डोळे मोडून त्याच्याजवळ लाडे लाडे बोलतांना मी तिला अनेकवेळां पाहिले होतें. तिच्याकडे मी वारंवार पहात असें हें तिच्याहि लक्षांत आलें होतें. माझ्या दिशेला बोट दाखवून शारंगपाणीजवळ कुजबुजतांना मी तिला एकदोन वेळां पाहिली होती. पण त्यामुळे तिचा राग येण्याऐवजी, त्याचाच राग मला आला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .