एकदा तारकेश्र्वरी आमच्याकडे चहाला आल्या. नॉर्थ अव्हेन्यूवरची जागा बदलून आम्ही रकाबगंज रोडवरच्या बंगल्यात राह्यला आलो होतो. त्यांना हा नवा पत्ता सांगायला मधू विसरले होते. त्यामुळे नॉर्थ अव्हेन्यूच्या फ्लॅटला कुलूप लागलेले पाहून त्या चकित झाल्या. मग कुणीतरी त्यांना आमचा नवा पत्ता सांगितला. तेव्हा त्या धापा टाकीत आमच्या घरी येऊन पोचल्या. बरोबर त्यांचा लहान मुलगा होता. त्या दिवशी केस कापून आल्या होत्या. त्यांचा तो बॉय कट पाहून आमच्याकडे आलेला एक छोटा पाहुणा मिन्या खट्याळपणे म्हणाल्या, ‘ही बाई आहे का पुरुष तेच समजत नाही.’ त्यांचे चिरंजीव नुकताच ‘आराधना’ चित्रपट पाहून आले होते. ते सांगत होते. ‘वो राजेश खन्ना. अभी बाप बना था, अभी बेटा. क्या गडबड है कुछ समझ में नही आता.’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .