कालिदासावर त्याच्या आश्रयदात्या नृपतीची अवकृपा झाल्यामुळे तो विजनवासांत असतांना त्यानें आपलें एकंदर वियोग दुःख प्रकट करण्यासाठीं हें काव्य लिहिलें आहे. मेघदूताचा एक टीकाकार वल्लभ यानें ही कल्पना प्रथम सूचित केली. पण तिच्या ग्राह्याग्राह्यतेबद्दल विद्वानांत पुष्कळच मतभेद आहे. प्रो. मिराशी यांना ती इतक्याच पुरती मान्य आहे कीं, कांहीं राजकारणास्तव विदर्भात रहात असतांना हें काव्य कालिदासानें लिहिलें असावें. अर्थात् या त्यांच्या मतांत वियोग गृहीत आहे; पण तो भर्तृशापजन्य मात्र नव्हे. परंतु, या त्यांच्या मतापेक्षां, राजाची अवकृपा व तज्जन्य स्त्रीवियोग वर्णन करण्यासाठींच कालिदासानें मेघदूत लिहिलें असावें, ही वल्लभप्रभृति टीकाकारांची कल्पनाच अधिक ग्राह्य वाटते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mahesh Pokharanakar
3 वर्षांपूर्वीछान लेख!
Ramdas Kelkar
3 वर्षांपूर्वीsir i cant continue reading this article although i hv renewed my subscription pl do necessary changes]