याला अपवाद फक्त पाटलांचा. त्यांच्या लेखनाचा पहिला विशेष जर कुठला जाणवत असेल तर त्यांतील गंभीरपणा. एखादी साधना चालावी तसे त्यांचे लेखन निष्ठेने चाललेले दिसते. अनुभवाची नवीं नवीं क्षेत्रे धुंडाळण्याचा, अनुभवाचे नवे नवे घाट शोधण्याचा प्रयत्न करण्यात त्यांना फार आनंद वाटतो. आणि कुठल्याही सवंग लोकप्रियतेचा मोह टाळण्याचा संयमही त्यांच्या आहे. त्यांनी विनोदी कथांचा अलिकडे एक बाज काढला तोही प्रकृतीने खास त्यांचा आहे. 'ऊन' आणि 'धिंड' या दोन संग्रहात या सगळ्या कौशल्याचे प्रकर्षाने दर्शन घडते. त्यांच्या ‘ऊन’ मधील कथांतून जर काही जणवत असेल तर अनुभवाची सखोलता. जीवनातल्या गाभ्यालाच ते जणुकाही हात घालतात,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .