यानंतर एक नवीन प्रयोग करून पहायचं मी ठरवलं. माझ्या रहस्यकथांच्या पुस्तकांवर सतत तुटून पडणारे तीनचार असंतुष्ट टीकाकार होते. त्यांना मी माझा नवा भजनांचा आणि भक्तिगीतांचा संग्रह अर्पण केला. वास्तविक याबद्दल थोडीतरी कृतज्ञतेची जाणीव त्या दुष्टांनी मनांत बाळगायची होती. परंतु त्यांपैकी एकदोघांनी भजनांच्या संग्रहावर अभिप्राय देतांना लिहिलं की “श्री. पोटतिडके यांच्या रहस्यकथा आणि भजनं यांमध्ये अधिक भिकार काय आहे हे ठरवणं थोडंसं कठीणच जाईल. मात्र भजनांची पुस्तके लहान, किंमतीनं कमी आणि पर्यायानं वाचकांवर त्यांचे अत्याचारही कमी, या तिन्हीही दृष्टीनं त्यांनी रहस्यकथांच्या ऐवजी भजनेच लिहिणे अधिक योग्य असे आम्हाला आवर्जून सुचवावेसे वाटते.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .