पाऊसओवी

पुनश्च    अरुणा ढेरे    2018-02-14 06:00:17   

बाहेर पावसाने झड धरलेली. आमचं तीन खोल्यांचं लहानसं घर. मधल्या घरात तसा अंधारच जास्त. तिथे आईनं जातं घातलेलं असायचं. पत्र्यावर पाऊस धुवांधार पडतोय. त्याच्या आवाजाची एक लयच लागायची. आत आई-आत्याची दळणं चाललेली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आणि त्यांची कामं मात्र रेंगाळलेलीच. आमचाही अभ्यासाचा जोर नसायचा. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या. मग सुट्टीच्या दिवशी गोष्टींची पुस्तकं हातात आणि डोकं आईच्या मांडीवर. आई-आत्याच्या ओव्या... जात्याची घरघर... बाहेरच्या पावसाचं मुसळधार कोसळणं आणि मंद काळोख आतबाहेर भरून राहिलेला... इतकी वर्षं लोटली आहेत पण डोळ्यांपुढून अजून हे दृश्य हालत नाही. त्यातला बारीकसारीक तपशीलसुद्धा विसरत नाही. कानांत भरून राहिलेलं ध्वनींचं ते विश्व तर असं रसरशीत आहे, की पुन्हा जर त्या घरात त्या जागी मी डोळे मिटले आणि बाहेर पावसाचं संगीत सुरू झालं, तर मी आईच्या ओव्यांचा शब्दन् शब्द जसाच्या तसा म्हणू शकेन. आज मात्र त्या ओव्यांचं सौंदर्य आणखी वेगळ्या रूपात मला जाणवतं. त्यातही पावसाची ही ओवी चटकन आठवते. पाम्यानं पावसानं। हालले भले भले मेघई रायानं। आस्मानी डेरे दिले॥ आई-आत्यांच्या डोळ्यांपुढे पाऊस येतो तोच मुळी एखाद्या सम्राटाच्या थाटात. भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते,अशा रुबाबात ते येतो आणि विस्तीर्ण आभाळात आपला तळ ठोकतो. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भवताल , कविता रसास्वाद , ललित , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    वा फारच सुंदर

  2. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    लेख वाचताना मन ओलेचिंब झाले

  3. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर

  4. Subhash Naik

      3 वर्षांपूर्वी

    पाऊस आणि लोकसाहित्य हा आवडता विषय अरुणा ढेरे यांनी त्यांच्या खास ललित मधुर शैलीत जुन्या आठवणी काढत मांडला आहे. - सुभाष नाईक, पुणे 9158911450

  5. Sunila

      7 वर्षांपूर्वी

    खुप छान लेख आहे मनातला पाऊस कागदावर उमटला.

  6. सुजाता पाटील

      7 वर्षांपूर्वी

    अरूणाताईंचं लोकसाहित्यातले असे नेमके आणि विपुल संदर्भ देत केलेलं ललितलेखन वाचणं फार आनंददायक असतं . त्या प्रवाही शैलीत मन हरवून जातं .

  7. ABHAYD

      7 वर्षांपूर्वी

    very nice.

  8. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    क्या बात हैं!?

  9. डा व्यंकटेश अंबादास लिगदे

      7 वर्षांपूर्वी

    खुपच छान पाउस डोळ्यासमोर येतो श्री पुनश्च टीम सशुल्क लेख फेसबुक वर घेता येतो का? कळवावे

  10. milindKolatkar

      7 वर्षांपूर्वी

    व्वा! विशेषत: शेवटी परवाच्या गारा मारणाऱ्या अवकाळीने विदर्भ-मराठवाड्यावर आणलेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याही पेक्षा आधी लहानपणी आई आणि तिच्या मैत्रिणी श्रावणात रात्री खेळायला जायच्या त्याची आठवण आली. 'रुणुझुणुत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा...'. आवडलं. धन्यवाद. -मिलींद. निसर्गाशी जोडलेली मानवीय नात्यातली विविधता अप्रतिम! -मेघा.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen