राष्ट्रीय सभा सामाजिक सुधारणेचा विचार करीत नाही या अँग्लो-इंडियनांच्या आक्षेपाला उत्तर देताना ते म्हणाले की, “ सामाजिक सुधारणेचे महत्त्व आम्ही विसरत नाही. पण राष्ट्रीय सभा ही प्रामुख्याने राजकीय सुधारणा करण्यासाठी आहे. यांत सामाजिक सुधारणेचा ऊहापोह झालाच पाहिजे असा आग्रह धरणे हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये गणिताच्या अगर तत्त्वज्ञानाच्या प्रमेयांची चर्चा झाली पाहिजे असा आग्रह धरण्यासारखे आहे.” यावेळी अँग्लो-इंडियनांचा हा ठराविक आक्षेप होता व सर आक्लंड कालव्हिनसारखे लोक, तुम्ही आधी सामाजिक सुधारणेच्या कार्यास लागा, असा मानभावी उपदेश करीत होते. या उपदेशाचा खरपूस समाचार न्या. तेलंगांनी २२ फेब्रुवारी १८८६ च्या एका व्याख्यानांत घेतला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .