१९०८ ते १९१४ हा लोकमान्यांच्या बंदीवासाचा काळ. या काळांत जनतेत राष्ट्रीयभावना उत्पन्न करणारा पुढारी, तापुरता कां होईना, नाहींसा होताच समाजांत एका अनिष्ट प्रवृत्तीला सुरवात झाली. प्रेम, प्रणय, काव्य या सर्व नैसर्गिक प्रवृत्तींची समाजाला गरज आहे. पण राष्ट्रीय भावनांना विसरून समाज या प्रवृत्तींच्या आहारी जात असलेला वरील काळांत खाडीलकरांना दिसला तेव्हां कालाची गरज ओळखून त्यांच्या लेखणींतून 'विद्याहरण' व ‘सत्वपरीक्षा’ ही नाटकें उतरली. 'सत्वपरीक्षा' नाटकाच्या प्रस्तावनेंतच ते लिहितात “प्रतिष्ठितांचा आधारस्तंभ नाहींसा झाला म्हणजे समाज अप्रतिष्ठित बनतो" या अप्रतिष्ठित समाजांत एका विशेष अर्थानें, उत्पन्न झालेल्या वेश्यावृत्तीला लगाम घालण्याकरितां हरिश्र्चंद्रासारख्यांना सत्याचरणाच्या कठोरवृत्तीचा अंगिकार करावा लागतो. तो तसा केला म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकराला प्रगट व्हावें लागते व वेश्यावृत्तीला आळा बसतो. हेच तत्व या नाटकांत त्यांनी रंगविले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .