खाडिलकरांची नाट्यकला सहेतुक आहे याबद्दल कोणाचे दुमत होणार नाहीं असें वाटतें, केसरीतील लिखाण सर्व दर्जांच्या वाचकांपर्यंत पोहोंचेलच असें नाहीं. पोहोचले तरी सर्वांनाच तें बुद्धिगम्य होईल असें नाहीं. याच्या उलट नाटक हें जन्मतःच सार्ववर्णिक आहे. सर्व वर्णांच्या लोकांनी एके ठिकाणी बसून एकाच वेळीं आस्वाद घेतां यावा अशी ती प्रामुख्यानें दृश्यस्वरुपी कला आहे. राष्ट्रीय भावनांचा प्रचार व प्रसार नाट्याच्या द्वारें यशस्वी रितीने जर कोणी केला असेल तर तो प्रथम खाडीलकरांनीच. उच्च अभिरुचीला भरून लोकरंजन करून त्या रंजनाच्या द्वारें राष्ट्रीय भावनांचें बीजारोपण बहुजन समाजाच्या अंतःकरणांत त्यांनीं पेरले. राष्ट्रीय भावना व राष्ट्रीय करमणूक यांची हृदयंगम सांगड प्रथम खाडीलकरांनीच घातली. म्हणूनच खाडीलकर हे नुसते "रंजनकार" नव्हते तर ते खरेखुरे "नाटककार" होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .