महाराष्ट्रीय मुसलमान

पुनश्च    हमीद दलवाई    2018-02-17 06:00:52   

महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख फेब्रुवारीच्या किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि परिपूर्ण नाही.‘आम्ही येथेच जन्मलो, येथेच वाढलो, इथली भाषा ही आमची भाषा आणि हा देश हा आमचा देश’ - हा युक्तिवाद (तो कितीही बरोबर असला तरी) स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा करण्यात आला आणि विफल ठरला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रीय मुसलमानांत मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी जो एक परकेपणा आलेला आहे, तो केवळ प्राचीन परंपरेने आलेला नाही. भाषिक आणि सांस्कृतिक अलगपणा जो आलेला आहे तो राजकीय अलगपणाच्या, फुटीरपणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेला आहे. राजकारणाचा भाग सोडला, तर आज भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मुसलमान एक प्रकारच्या अलगपणाच्या भूमिकेत वावरत आहेत. हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल, तर आम्हा मुसलमानांच्या शैक्षणिक भूमिकेचा आधी विचार केला पाहिजे. ‘मौज’ साप्ताहिक : ११ एप्रिल १९५४ स्वातंत्र्याच्या काळापर्यंत आमच्या मुसलमान विद्यार्थ्यांना वेगळ्या उर्दू शिक्षणाची तरतूद करण्यात आली. इथल्या बहुजन समाजाशी असले-नसलेले सांस्कृतिक संबंध तोडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करण्यात आला. उर्दू भाषेची वेगळी परंपरा निर्माण करण्यात आली. परंतु इथले संबंध आम्ही पूर्णपणे तोडू शकलो नाही, की मराठीशी फारकत करून घेऊन उर्दू पचवू शकलो नाही. आज तर मुस्लिम समाज या प्रश्नाकडे गोंधळलेल्या दृष्टीने पाहत आहे. आपली भाषा आणि आपली संस्कृतीच अखेर महाराष्ट्राच्या समाजजीवनातले आपले स्थान निश्चित करणार आहे, याची त्याला पुरती

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , मौज , शिक्षण , भाषा
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. jyoti patwardhan

      4 वर्षांपूर्वी

    हमीद दलवाईं सारख्या नेत्यांच्या पाठीमागे जर बहुसंख्य मुस्लिम समाज उभा राहिला असता तर आज देशात परिस्थिती खूप वेगळी असती.

  2. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    हा लेख एक ऐतिहासिक दस्त आहे. राज्य शास्त्र व कायदा शिकणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त.

  3. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    हमीद दलवाईबद्दल माझा प्रागतिक मुसलमान मित्र -जो गुजराथी माध्यमातून शिकलेला, उर्दूचा गंध नसलेला -म्हणवयाचा "दलवाईला मुसलमान असण्याची लाज वाटते!"दुसऱ्या मित्राच्या वडिलांनी त्याला मराठी मिडीयम आणि त्याच्या बहिणीला उर्दू माध्यम असा तोडगा काढला! हमीद दलवाईच्या लिखाणा -विचारावर बव्हंशी हिंदूच बोलतात /लिहितात! मात्र दलवाई महात्मा फुल्यांसारखाच मोठा विचारवंत आणि सक्रिय सुद्धा!

  4. Prashant Chaudhari

      4 वर्षांपूर्वी

    अमित भाईंचा हा लेख केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे; तर हिंदुस्थानातील मुस्लिम समस्येवर सुचविलेला एक उत्तम उपाय आहे. ही बाब भारतातील राजकारणी, समाजकारणी आणि शिक्षण विद लक्षात घेतील तो सुदिन म्हणायचा.

  5. Diwakar Ganjare

      4 वर्षांपूर्वी

    हमीद दलवाई नी मोजक्या आयुकाल खंडात परिवर्तनाचा संघर्ष केला तो अद्वितीय आहे. दुर्दैव असे की पु. ल. देशपांडे, रामचंद्र गुहा, साने गुरुजी आणि साधना आणि काही मोजके अपवाद वगळता मराठी सारस्वताने त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. भारताने वैश्विक संवेदना असणारी डॉ. रवींद्रनाथ टागोर, म. गांधी सारखी दिग्गज जगाला दिलीत. इथल्या भूमीत मात्र सनातन्यांच्या कोलाहलात उदारमतवाद आणि तर्कपूर्ण बुध्दीवादाची हेटाळणी करून तो कुजवल्या गेला. दुर्दैव आहे भारतीय समाजाचे की आम्ही अजूनही मध्ययुगीन काळात जगतो आहोत.

  6. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    चिंतनशील लेख

  7. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय वाचनीय वैचारिक लेख !!....अश्या विचारांची आज फार गरज आहे .

  8. Shriniwas Kalantri

      4 वर्षांपूर्वी

    हमीद दलवाईंनी खरोखर मौलिक विचार मांडले आहेत .छान लेख

  9. Vinesh Salvi

      4 वर्षांपूर्वी

    धन्यवाद पुनश्च....

  10. Devendra

      7 वर्षांपूर्वी

    वारसा हे खूप गोड रूप झाले, आगीशी कोण खेळणार, हमीद दलवाई यांचे विचार पचविलेले नि मरेपर्यंत त्यांच्या विचारांशी बाध्य राहिलेल्या फक्त तीनच व्यक्ती मला माहित आहेत. स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक बाबूमिया बँडवाले, सय्यदभाई आणि दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई. बाबूमिया बँडवाले यांचा नातू हमीद सय्यद आणि हुसेन दलवाई देखील होते बरोबर सुरवातीला, पण हुसेन दलवाई यांनी सक्रीय राजकारणाचा मार्ग पत्करला नि हमीद बाबूमिया सय्यद यांनी एकंदर अलिप्त राहणे पत्करले आहे. आज सय्यदभाई यांची एकांडी मार्गक्रमणा चालू आहे. स्वतःच्या घटस्फोटीत बहिणींला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे नेताना ते या चळवळीत सहभागी झाले ते आजतागायत. आपल्या मुस्लीम सत्यशोधक समाज या संघटनेची मर्यादा ते ओळखून आहेत, अजून पाचशे वर्ष काहीही बदल होणार नाहीत रे बेटा, आम्ही करतोय ती फक्त दगडावरची पेरणी, काहीही उगवत नाही दगडात, असे ते भेटल्यानंतर अगदी जीव तोडून सांगत असतात. त्यांच्या (पुरस्कारप्राप्त) आत्मचरित्राचे नावच मुळी त्यांनी दिले आहे "दगडावरची पेरणी". आवर्जून वाचावे असे पुस्तक.

  11. lawandprashant

      7 वर्षांपूर्वी

    obviously due to the problem of distance-travelling,residential facilities(hostels) and in case of girls its security.

  12. nikasawadekar

      7 वर्षांपूर्वी

    सुदर आर्टिकल. फक्त एक गोष्ट कळली नाही. "उर्दूतून शिक्षण घेत असलेली ही मुले पुढे मराठी माध्यमातून दुय्यम शिक्षण घेऊ शकत नाहीत. जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी असलेल्या उर्दू हायस्कूलमध्येही ती जाऊ शकत नाहीत. अखेर शिक्षणाला रामराम ठोकण्यातच याची परिणती होते. अशाने मुस्लिम समाज अज्ञानाच्या अंध:कारात कायमचाच खितपत राहणार आहे!." जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणी असलेल्या उर्दू हायस्कूलमध्ये ती का जाऊ शकत नाहीत??

  13. deepa_ajay

      7 वर्षांपूर्वी

    Hamid bhai has written great in 1954, even today I have good no marathi muslium friends who has similar feeling, unfortunetly in 2018 because of political compulsions they are unable to react, neverthless wait and watch is the only thing

  14. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    प्रयत्न करूया....

  15. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    हमीदभाईंच्या इंधन मधले काही उतारे वाचायला मिळतील का?

  16. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    हमीदभाइंचा वारसा दुर्दैवाने पुढे कुणी चालवला नाही



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen