'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबरीची रचना वरील आकृतीने अधिक स्पष्ट होईल. कुशंकने आपल्या अनुभवांतून पात्रांना आणि क्षणांना ज्या वर्तुळात कैद केले आहे, त्यावरून असे वाटेल की, या पात्रांना आपापली स्वयंभू गती असून ती वास्तवातील स्थित्यंतरांप्रमाणेच दिशाहीन आहे. मौजेची गोष्ट ही की, हे वर्तुळ आपण जितके जितके लहान आणि बंदिस्त करत जाऊ त्या प्रमाणात सारेच वास्तव असंबद्ध आणि दिशांन हीन भासू लागेल. आणि शेवटी असंबद्धता, असहायता आणि वेदना, इतकेच उरेल. दुसरे असे की, हे वर्तुळ आपण उचलून कोठेही ठेवले तरी जोपर्यंत त्याची स्थलकालव्याप्ती कायम आहे, तोपर्यंत दृश्य कमीजास्त प्रमाणात असंबद्धच वाटत राहील. त्यामुळे अशा बंदिस्त वर्तुळातून निघणारा निष्कर्ष असंबद्धतेचाच असणार.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .