माझे स्वतःचेच उदाहरण पाहाना. वयाची ६८ वर्षे पूर्ण. मुले-बाळे, बायको सज्ञवजण आहेत, स्वतःच्या पायावर उभा राहून आज एक मध्यमवर्गीय (सधन) कुटुंब चालवितो आहे. ४ मुले सुशिक्षित (पदवीधर/द्विपदवीधर). पैकी एकजण परेदशात चांगल्या व्यवसायात. एक मुलगी लग्न होऊन सासरी सुखाने नांदते आहे. एक मुलगी मात्र लहानपणापासून (जन्मच पोटात ७व्या महिन्याची असताना झालेला) अशक्त, किंचित अपंगच, साधारण मंद बुद्धीची. तशी घरात कामधाम करीत असते. समजही बऱ्यापैकी, परंतु शाळेतील शिक्षणात फाच मागे म्हणून चांगली अक्षर ओळख नाही. गणित-ज्ञान नाही अशी. (वय तीसचे पुढे). तिच्या कमनशिबाने पहिल्यापासूनच तला आईची फारशी माया मिळाली नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .