भाग पहिला - महामहोपाध्याय श्री. दत्तो वामन पोतदार


महाराष्ट्रांत तर श्री. सावरकरांच्यानंतर मराठी भाषेत तडफदार, आकर्षक आणि झपाटून टाकणारे तेजस्वी वक्तृत्व करणारे जे कांहीं चार सहा वक्ते आहेत, त्यांत एक हुकमी आणि हिकमती, बहाद्दर आणि बेडर वक्ते म्हणून प्रो. दत्तोपंत पोतदारांचें नांव निश्चितपणें घ्यावें लागेल. आवाज, ऐट, आत्मविश्वास व बोलण्यांतील घरगुतीपणा यांच्या जोरावर ते सभा जिंकूं शकतात. विद्वत्तंची नुसती जडजंबाल रुक्षता मुळींच नसून, उपमा, दृष्टांत, व्याजोक्ति, वक्तोक्ति, विनोद व उपहास यांची त्यांच्या व्याख्यानांत अगदी बहारदार मेजवानीच असते. प्रतिभा व स्फूर्ति त्यांचें सदैव दास्यत्व करीत असतात. हजरजबाबीपणा व कोटीबाजपणा यामुळे तर प्रत्युत्पन्नमतित्वाची अधिकच रंगत चढते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen