तिचें अंग गोरेपान होतें आणि सरळ नाकानें त्या रंगाला मोठी शोभा आणली होती. तिची अंगलट चिंचेच्या फोकासारखी लवचिक वाटत होती आणि अंगोपांगावरून तिचा तरुणपणा रसरसत होता. उफाड्याच्या अंगाची आणि पुष्ट बांध्याची ती बाई एवढेच बोलली, थोडे थांबली आणि पुढे चालूं लागली. तिचें हें त्रोटक आणि केवळ मुद्यापुरतें बोलणें पाहून मला मोठा राग आला. म्हणजे ही काय माणुसकी झाली ? माणूस एवढें विचारते आहे अगत्याने आणि आपण खुशाल अंगाला झटका देऊन पुढे जायचे म्हणजे काय ? कुणीहि भेटले तरी इकडेतिकडे बोललें पाहिजे माणसानें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .