तालीच्या पलीकडे हिरवेगार गवत पसरले होते आणि मघांचाच ओढा वळून खळखळत होता. पलीकडच्या बाजूला तीनचार माणसें हातांत धोतर धरून मासे पकडत होतीं. त्यांना बघून मला हायसें वाटले, हातांतले खोगिराचे ओझें खालीं टाकून देऊन मी हुश करून बसलो. त्यांना हांक मारून विचारले,
"ओ पावणे, घोडं गेलेलं बघितलं का हिकडनं ?"
त्याबरोबर तीं माणसें हातांतले धोतर सोडून देऊन माझ्याकडे आ करून बघू लागली. त्यांच्यांतल्या एकाचे मिशा आंकडे वळून गालावर आले होते आणि ओठाखालीं दोन्ही आंकडे मिळाल्यासारखे दिसत होते. त्यामुळे चेहऱ्यावर काळ्या बदामाचें चित्र मोठें झोकदार निघाले होतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .