समोरच एक कोप दिसली. तिच्या मेढीला टेकून एक म्हतारा इसला होता. चिलीम ओढीत आणि बाजूला थुंकत. त्याच्याकडे असते बघून मी पुढे चाललो तेव्हां त्यानेंच मला हळी दिली. मी थांबलों हें बघून तो उठला आणि जवळ ठेवलेली काठी उचलून माझ्याकडे येऊं लागला. त्याच्या पाठीचे हाड कमानीसारखें वांकले होते आणि भुईकडे टक लावून काठी टेंकीत टेंकीत तो येत होता. त्याचें अंग इतकें थरथरत होते आणि त्यामुळे त्याच्या हातांतली काठी इतकी हेंदकाळत होती कीं त्याला काठीचा आधार असण्याऐवजी काठीलाच त्याचा खरा आधार होता असें वाटत होतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .