"गवळी देत होता दूध, म्हणतो कसा ? आजी, तुम्हीं पैसे दिले नाहींत तरी चालेल मला. मिळाले तर उशीरां द्या, पण ह्या आमच्या छोट्या बुवाला दूध प्यायला द्या. ह्या छोट्या गवईबुवानीं मला तो तुकाराम बुवांचा ‘रंजले गांजले' अभंग म्हणून दाखवावा न् मी त्यांना दूध देईन. अवो त्याच्या गान्यानं लई आनंद होतो मनाला. मीच आज त्याचे दूध परत केलं. तीन महिन्याचे पैसे द्यायचेत त्याला. किती दिवस पैसे न देतां राहायचं ? त्यानं पैसे मागितले असते तर बरं वाटलं असतं. पण कधींही तोंड उघडत नाहीं. तूं जसा शिकवणी करून मुकाट्यानं घरी येतोस, तसा तो दूध देऊन जातो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .