षड्ज संपवून अतुलनं ऋषभ लावला. मारव्याचा ऋषभ ! देवानं म्हणें जग निर्माण केलं आणि पुढं त्याला क्षणभरच कांहींही सुचेना. तो त्या जगाकडे पहात बसला. माणूस नसलेलं तें जग ! भयाण पोकळीनं भारलेलं ! आवाज असून असह्य वाटणारं ! मारव्याच्या ऋषभासारखं ! मला काहींतरी दे, जीवन दे, आशा दे, सहवास दे, भविष्य दे, ह्यांतलं कांहीं नसेल तर दुःख तरी अमाप दे, असं आक्रंदन करणारं जग ! त्यांतून म्हणे हा मारण्याचा ऋषभ निर्माण झाला. देवाला देखील असह्य असा ! आणि देवानं स्वतःच्या त्या कृतीला घाबरून मानव निर्माण केला व ही पोकळी लौकर लौकर भरून टाकली
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .