भाग तिसरा - घर घर अलख जगाये


हो, खरं तें. आज दृष्ट काढा म्हणतील आणि उद्यां त्याच्या रिकाम्या पोटावर टिचक्या वाजवतील. लोकाना कुणाचं आलंय सुखदुःख. आज म्हणतील पूर्वसंचित घेऊन आलाय हा मुलगा. पण उद्यां आवाज फुटल्यानंतर त्याच्या पिचणाऱ्या आवाजाची तेवढ्याच पिचक्या आवाजांत टिंगल मारतील. नांव ठेवतील. जगांतनं उठवण्याचा प्रयत्न करतील. मीं भोगलंय ग हें सगळं. कंटाळा आलाय, उबग आलीय ह्या लोकांच्या वेश्यावृत्तीची. गाणाऱ्याला नायकिणीच्या मापानं मोजणाऱ्या लोकांची. एके काळच्या तिच्या सुंदर देहाला ह्याच लोकानीं आसुरी वासनेनं भोगलेल्या तिच्या देहाला, पडत्या काळीं ओरबाडणाऱ्या ह्या लोकांचा वीट आलाय मला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .कथा

प्रतिक्रिया

  1. Jagadish Palnitkar

      3 महिन्यांपूर्वी

    वा!! बुवांचा साहित्याचा, काव्याचा अभ्यास दांडगा होता, हे ठाऊक होतं; पण ते एक उत्तम लेखकही होते हे जाणवलं ही कथा वाचून. चपखल प्रतिमांचा वापर, शब्दांची निवड वगैरे पाहता एखादया कसलेल्या लेखकाचं लिखाण वाचतोय असं वाटलं! कला जीवनाशी कशी घट्ट जोडलेली असते आणि माणसाला लौकिकाच्या पलीकडचं काहीतरी देत असते, हे एका सिद्धहस्त कलाकाराकडून समजून घेण्यात वेगळीच मजा आहे. धन्यवाद!!

  2. Mahesh Pokharanakar

      3 महिन्यांपूर्वी

    अप्रतिम, बुवांच्या गाण्यासारखीच!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen