काकीचं उत्तर येई तें मोठें चमत्कारिक असे. त्यांचं माझ्या मालकांबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं. ते अति कुत्सितपणं पत्र लिहीत नि तेंहि माझ्या नांवावर. माझ्या मालकांवर लक्ष ठेवायला, त्यांना खराब व्यसनं लागू नयेत म्हणून काळजी घ्यायला ते मला बजावीत आणि लिहीत, 'तूं रंग्याबरोबर आहेस म्हणूनच मला त्याची काळजी वाटत नाहीं. नाहींतर मी त्याला एक छदामहि पाठविला नसता.' माझ्या वेळच्या वेळी जाणाऱ्या सविस्तर पत्रांवर ते खूष होते. माझे मालक म्हणत, 'दाम्या, लेका, तूं मला सोडून गेलास तर मला परत कोल्हापूरला जाऊन खितपत पडावं लागेल. तुझी मुख्य ड्यूटी म्हणजे काकांची मर्जी सांभाळायची.'
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .