ज्या वेळेस मनुष्य जन्मास येतो त्या वेळेस त्यास कांहीं जन्मसिद्ध हक्क प्राप्त होत असतात. ते हक्क कृत्रिम नसून नैसर्गिक असतात. अशा हक्कांपैकी विचारस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य हे प्रमुख होत. या हक्कांवर अतिक्रमण करणारा इसम अगर समाज अगर राजशक्ति हीं मनुष्यत्वाचा उघड उपमर्द करतात, इतकेंच नव्हे तर परमेश्वरी न्यायाच्या दृष्टीनें घोर पातकही करतात. परमेश्वराच्या अनंत उपपदांपैकी 'स्वतंत्र' हें उपपद अत्यंत महत्त्वाचें होय. परमेश्वर स्वतः स्वतंत्र आहे व त्याचप्रमाणे त्याची प्रतिमा जो मनुष्य तोही स्वतंत्र असावा असा त्याचा आदेश आहे. परमेश्वराच्या साम्राज्यांत त्यानें कोणाचेंही स्वातंत्र्य हिरावून घेणें संभवनीय नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .