सर्वांत मौज ही कीं, एकप्रकारें सुधारणा अजून हवेंतच आहेत. "बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी" या म्हणीचें हें एक प्रत्यंतरच होय. ज्या समाजांत शहाणसुर्त्या समजल्या जाणाऱ्या लोकांची ही स्थिति, तेथें अडाणी लोकांच्या मनाची ठेवण कशा प्रकारची असेल याची प्रत्येकानें आपल्याशींच कल्पना करावी. दोन्ही पक्षांची मतें प्रामाणिक आहेत याबद्दल वाद नाहीं; व या फाटाफुटींत त्यांचा दोष आहे असेही आम्हांस वाटत नाहीं. हा दोष त्यांचा नसून ते ज्या परिस्थितीत परंपरेंत व संस्कारांत वाढलेले आहेत त्यांचा आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .