या 'सर्वांवरून एवढी गोष्ट निश्चित आहे कीं, कांहीं दुय्यम स्मृति व धर्मग्रंथ वगळले असतां बाकीच्या स्मृतींतून व ग्रंथांतून मिश्रविवाह सशास्त्र मानले आहेत, इतकेंच नव्हे तर अशा विवाहापासून होणारी संतति औरस समजली जाऊन तिचा वडिलार्जित मिळकतीवर हक्कही कबूल करण्यांत आलेला आहे. आतां रूढीच्या दृष्टीनें असले विवाह बेकायदेशीर ठरविले आहेत व शास्त्राद्रूढीर्बलीयसी या न्यायानें हिंदुसमाजांत रूढीचे अत्यंत प्राबल्य आहे खरें. परंतु रूढी कांहीं वस्तुतः अशी चीज नाहीं कीं, तिच्यांत फेरबदल करणें शक्यच नाहीं. शास्त्रांना गुंडाळून ठेवणारी रूढी जर जन्मास येऊं शकते, तर त्या रूढीस न जुमानणारी दुसरी एकादी रूढी तिच्या ठिकाणीं कां अधिष्ठित होऊं नये ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .