गांवांतल्या कांहीं हौशी लोकांनीं एक नाटक बसविण्याचे ठरविलें, हें पाहून गांवांतल्या दुसऱ्या एका गटालाहि चेव चढला. त्यानेंहि एक नाटक करण्याचा घाट घातला. दोन्ही नाटकें होतीं श्रीकृष्णचरित्रावरचीं. दोन्ही गटांना कृष्णाची भूमिका करायला योग्य असा मुलगा हवा होता. त्यांची नजर श्रीपादवर गेली. श्रीपाद तरतरीत होता, नाकीडोळी नीटस होता, त्याचा आवाज गोड होता, भिक्षुकाचा मुलगा असल्यानें तो सहज मिळण्याजोगा होता. 'श्रीपादला आमच्या नाटकांत काम करूं द्या,' असा आग्रह गंगाधरभटांजवळ दोन्ही गटांनी धरला. गंगाधरभट कावून गेले. त्यांना वेगळीच भीति वाटू लागली. ‘श्रीपादला जर नाटकाचा नाद लागला तर तो बिघडेल. नकोच तें!’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .