अत्यंत वाईट परिस्थितींत 'बलवंत' बंद करून मास्टर दीनानाथ पुण्यास बिऱ्हाड करून राहिले. त्यांची आर्थिक स्थिति कमालीची बिघडली होती. त्यांचे पूर्वीचे उपकार स्मरून श्रीपाद त्यांच्याकडे जात-येत असे. दीनानाथांची दुरवस्था पाहून श्रीपाद त्यांना म्हणे, "तुमच्या मुलींचे आवाज चांगले आहेत. त्यांना सिनेमांत घातलेत तर पैसे मिळतील." पण ही कल्पना दीनानाथांना मानवत नसे. ते रागावत. पुढे त्यांनी परवानगी दिल्यावर श्रीपादनें लतेला व तिच्या बहिणींना मास्टर विनायक यांच्याकडे नेलें. लतेचें गाणे ऐकून विनायकांनी आश्वासन दिले कीं, मी हिचा अवश्य उपयोग करून घेईन. हें बोलणं तेवढ्यावरच राहिलें. नंतर १-२ महिन्यांतच दीनानाथ वारले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .