गांधींच्या राजकारणाचे स्वरूप ध्यानांत घेतलें कीं, टिळकांच्या राजकारणांत मुरलेल्यांना तें कोठें अनाकलनीय झालें, हें ध्यानत येतें. खुद्द लोकमान्यांना गांधींच्या सामर्थ्याची जाणीव असावी. गंगाधरराव देशपांडे, खाडिलकर यांच्या आठवणींवरून हें उघड होतें. अवंतिकाबाई गोखल्यांच्या गांधीचरित्राला त्यांनीं जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यावरूनही तें स्पष्ट दिसते. चिरोल खटल्यांतील एका प्रश्नोत्तरांत त्यांनी 'धार्मिक भावनेने आपण दुःख सोसलें म्हणजे इतरांवर त्याचा परिणाम होतो' असा निःशस्त्र प्रतिकार या स्वतः ला मान्य असलेल्या साधनाचा खुलासा केला आहे. तथापि त्यांच्या सर्व राजकारणाची बैठक कायदेनिष्ठ बुद्धियोगाची होती. साधनशुद्धतेवर त्यांचा विश्वास नव्हता. जनतेच्या सर्वांगीण सुधारणेचे तत्त्व व आचार यांतही त्यांनी फरक केला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .