जी गोष्ट केळकरांची, तीच आंबेडकरांची, आणि सावरकरांची. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींकडून सरकारनियुक्तत्वाचा उल्लेख झाल्यामुळे आंबेडकरांच्या मनाला खबखवलें. पहिल्या परिषदेत त्यांनी संयुक्त मतदारसंघाचीच मागणी केली होती; पुढे ब्रिटिश भेदनीत्यनुसार विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला. गांधींच्या यापुढील हरिजन चळवळीनें अस्पृश्यही त्यांना अनुकूलच झाले. आपल्या राजकीय पुढारीपणाला बसलेल्या या शहामुळे त्यांच्या गांधीविरोधानेंही तात्त्विक पातळी सोडली. या पुढारीपणाच्या दुखावलेल्या अहंकारांतून किती प्रकारचा बाष्कळ व पोरकट कोटिक्रम त्यांच्या अतिशय तल्लख बुद्धींतून उत्पन्न झाला हें त्यांचीं भाषणें अथवा पुस्तकें वाचलेल्यांना फिरून सांगावयाला नको.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .