"कॉफी छान झाली आहे." कॉफीचे घोट घेत विजया पुढे म्हणाली, "तुमची पुरुषांची चैन आहे. तुम्हांला बाकीच्या चैनी पुरेशा होत नाहींत, म्हणून ‘स्मोकिंग'ची देणगी मिळालेली आहे. एखाद्या मुलीनं 'स्मोकिंग' केलं कीं आमचे लोक सगळ्या मुली बिघडल्या, बेताल झाल्या, असे सिगारेटच्या धुराचे लोट तोंडावाटे काढीत बहकायला लागतील."
“यूरोपमध्यें अन् अमेरिकेंत बायका पुरुषांच्या बरोबरीनं धूम्रपान करतात. आपल्याकडेहि कोळी, वारली वगैरे आदिवासी बायका मजेत विड्या फुंकीत असतात, पण आपल्या सुधारलेल्या जातींत बायकांना धूम्रपान वर्ज्य आहे." चंदू म्हणाला.
“बायकांच्याच बाबतींत ही धूम्रपानबंदी काय म्हणून? पुरुष सदोदित बायकांच्यावर निर्बंध घालू पहातात नि आपण नामानिराळे रहातात." – विजया.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .