धाकजींनीं त्या खवळलेल्या परिषदेचा तात्पुरता समारोप केला. ते म्हणाले, “ह्या प्रश्नाचा निकाल करण्यासाठी आपण एक दिवस मुदत राखून ठेवूं या. घाईघाईनें असले महत्त्वाचे प्रश्न सोडवणे ठीक नाहीं. वराच्या जातीचे लोक नि वधूच्या जातीचे लोक ह्या विवाहाचें स्वागत कसे काय करतात तें पाहिले पाहिजे. कारण लग्न झाल्यावर मधुचंद्राचे चार दिवस गेल्यानंतर इतर जगाशीं वधूवरांचा संबंध येणारच. चंदूचे विचार खरोखरच सुधारणावादी आहेत कीं आपमतलबी आहेत त्याचाहि निर्णय झाला पाहिजे. नाहीं तर पांढरपेशा समाजांतली मुलगी मिळवण्यापुरताच त्याचा उदारमतवाद असला तर त्याला कांहींच किंमत देतां येणार नाहीं."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .