विजयेकडे बोट दाखवीत धाकजी हंसत म्हणाले, "हीच ती विजया! चांभारकन्या. मात्र ही गोष्ट तुम्ही बाहेर पसरवूं नका. विजयेचा जन्म जरी चांभाराच्या पोटीं झालेला असला तरी ती संस्कारानं सोमवंशी क्षत्रिय आहे. संस्कारात् द्विज उच्यते । हिला आमच्या जातीची म्हणायला बिलकुल हरकत नाहीं. अन् तुम्ही तसे उदारमताचे आहांतच. तेव्हां म्हटलं, अगोदरच हिचं जन्मरहस्य सांगून टाकलं म्हणजे पाठीमागून गैरसमज नि कुरकुर नको. बरं आहे, ह्याच बैठकींत वाङ् निश्चय करायला काय हरकत आहे? "
चंदूचा चेहरा उतरलेला आणि सोपानरावांचा चढलेला दिसत होता. "एकूण ही चांभाराची पोरगी आमच्या घरांत घालायला तुम्ही बघत होतां होय सोकाजी ? लई 'हे' दिसतां आहां राव !" सोपानराव रागानें म्हणाले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .