"प्रत्येक विनोदी नटाची कामं करण्याची लकब वेगळी, ढब वेगळी. प्रत्येकाच्या क्लृप्त्या वेगळ्या, ट्रिक्स वेगळ्या. एका विनोदी नटाची कॉपी दुसऱ्याला फारशी उपयोगी पडत नाहीं. याचं कारण एकाचं व्यक्तिमत्त्व दुसऱ्यासारखं नसतं हें आहे. अनुकरणानं तो दुसरा विनोदी नट हास्यास्पद होण्याची भीति असते. बोलण्याची, दृष्टिक्षेपाची, वाक्य फेकण्याची प्रत्येकाची खास अशी लकब असते अन् ती ज्याची त्यालाच शोभून दिसते.
"प्रेक्षकांना हंसवणं अगर रडवणं सोपं काम नाहीं. लोक निष्कारण हंसत नाहींत, टाळ्या देत नाहींत वा रडत नाहींत. त्यांच्या आंत कांहींतरी नेऊन पोहोचवावं लागतं, तेव्हांच ते हंसतात किंवा रडतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .