अरुणोदय संगीतमंडळी व नवजीवन संगीतमंडळी या संस्थांत वसंतरावांनी केलेल्या विनोदी भूमिकावर सर्वस्वी वसंतरावांची स्वतःची छाप होती, तेथें त्यांना कोणी मार्गदर्शक नव्हता किंवा त्यांनीं चूक केली तर त्यांचा कान पकडणारेहि तेथें कोणी नव्हते. पण नटवर्य लोंढे यांच्या 'राजाराम संगीत मण्डळी'मध्ये ते दाखल झाल्यावर मात्र ही परिस्थिति साफ बदलली. तेथें नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर होते. नाटकांचें दिग्दर्शन व नियंत्रण ते करीत. त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली 'राजाराम'मध्यें 'प्रेमसंन्यास' हें नाटक बसलें. त्यांतील गोकूळची भूमिका चिंतामणरावांनीं वसंतरावांना परिश्रमपूर्वक शिकविली. आयुष्यांत पहिलें शास्त्रशुद्ध अभिनयशिक्षण वसंतरावांना मिळालें तें या वेळीं ! त्यांचा जणुं येथें पुनर्जन्म झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .